विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या यजमानत्वात
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव (मुले) २०२५ स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
बुधवार दि. १० डिसेंबर २०२५ वेळ सायं. ५.०० वाजता शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय, वणी येथील खुल्या रंगमंचावर
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदासजी तडस यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न होईल.
या प्रसंगी अविनाश लोखंडे विदर्भ उपाध्यक्ष बॉडी बिल्डिंग फीटनेस असोसीएशन, प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे सिनेट सदस्य, सं.गा.बा.अ.वि. अमरावती,
प्रा.डॉ. प्रशांत विघे सिनेट सदस्य, सं.गा.बा.अ.वि. अमरावती, शिल्पा कोकाटे तालुका क्रीडा अधिकारी वणी, डॉ. धर्मेंद्र तेलगोटे प्राचार्य बाबासोहब पारवेकर महाविद्यालय, पारवा हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेमध्ये ६० किलो, ६५किलो, ७०किलो, ७५किलो, ८०किलो, ८५किलो, ९०किलो आणि ९० किलोपेक्षा अधिक अशा आठ गटांमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित पाचही जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अनेक स्पर्धक सहभागी होणार आहेत.
शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नरेंद्रजी बरडिया, सचिव सुभाषराव देशमुख, सहसचिव अशोकराव सोनटक्के, सदस्य उमापती कुचनकर, ओमप्रकाश चचडा, अनिल जयस्वाल, नरेंद्र ठाकरे, विनायक तत्त्वादी,नरेश मुणोत, विश्वास नांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वणी नगरामध्ये प्रथमच संपन्न होत असलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण संधीचा वणीकर जनतेने मोठ्या प्रमाणात आस्वाद घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे आणि
शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. उमेश व्यास यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

