ठळक बातम्या

    वणी येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती साजरी

     



    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : येरंडेल तेली समाज संघर्ष बहुद्देशीय सामाजिक संस्था वणी यांच्या कार्यालयात श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून विधिवत पूजाविधी संपन्न झाला.

    कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये शरद रा. तरारे, संजय शा. सहारे, सागर सु. समर्थ, लोकेश रा. तराळे, राहुल सु. कोलते, गणेश कावळे यांच्यासह एरंडेल तेली समाजातील बांधव सहभागी झाले होते.

    कार्यक्रमाचे संचालन संजय शा. सहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर सु. समर्थ यांनी मानले. या प्रसंगी संताजी जगनाडे महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

    Photo