ठळक बातम्या

    राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी: येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री बाविस्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून श्री सय्यद गौश उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भाषणे, परिसंवाद, वैज्ञानिक प्रात्यक्षिके याद्वारे आपली सृजनशीलता दाखवली. सी व्ही रामन यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. 


    कार्यक्रमाचे वक्ते श्री सय्यद सर यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनास चालना देण्याकरिता विविध प्रात्यक्षिके दाखवीत आपले वक्तव्य प्रभावी तसेच रंजक बनविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाविस्कर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विज्ञानाची गरज तसेच फायदे याचे महत्त्व विशद केले. श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री ओमप्रकाशजी चचडा व सदस्य श्री विक्रांतजी चचडा यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या विद्यार्थिनी नव्या जीवतोडे आणि दिव्या ढेंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन श्रावणी ढवस हिने केले. हा कार्यक्रम सौ एकता गौरकार मॅडम, कु. अंजली पाझारे आणि श्री योगेश ढेंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.









    Photo