ठळक बातम्या

    नांदेपेरात शेतकऱ्याच्या चणाच्या ढिगाला आग; ८० पोत्यांचे नुकसान, संतापाची लाट


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

     वणी : दिंनाक १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री वणी तालुक्यातील नांदेपेरा येथे धक्कादायक घटना घडली. येथील शेतकरी योगेश नानाजी डोंगे यांच्या शेतात काढणीसाठी जमा करून ठेवलेल्या चणाच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    या आगीत अंदाजे ८० पोते चणा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.


    आधीच शेतीमालाच्या भावाचा प्रश्न, वाढलेला उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी हवालदिल असताना या प्रकारामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित अज्ञात व्यक्तीचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    तसेच नुकसानग्रस्त शेतकरी योगेश डोंगे यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.


    या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



    Photo