विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी सुवर्णसंधी!
महसूल व इतर शासकीय सेवा, प्रमाणपत्रे, 7/12 दुरुस्ती, विविध योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी आणि अनेक सेवा — एकाच ठिकाणी, एका दिवसात!
• आपल्या मंडळाच्या ठरलेल्या दिवशी उपस्थित राहा
• प्रलंबित अर्जांची प्रत सोबत आणा
• सर्वांनी लाभ घ्या, इतरांनाही कळवा!
सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील नवीन तरतुदींची जनजागृती व प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे तसेच नागरिकांना Single Day Service Delivery द्वारे सेवा प्रदान करणे या उद्देशाने माहे मार्च ते मे या कालावधीत राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद / नगर पंचायत पातळीवर “छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियान – टप्पा १” राबविण्यात येत आहे.
शासनाच्या निर्णयानुसार वणी तालुक्यातही मंडळ स्तरावर खालीलप्रमाणे शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागाबरोबरच शासनाच्या इतर विभागांकडे प्रलंबित असलेली प्रकरणे व सेवा विषयक अर्ज तत्काळ निकाली काढण्याचा निर्णय वणी तालुका प्रशासनाने घेतला आहे. तसेच शिबिराच्या निमित्ताने उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. खाली नमूद केलेल्या तारखांपूर्वी शासनाचे प्रतिनिधी गावनिहाय भेट देणार असून आवश्यक सेवांसाठी अर्ज सादर करावेत. यापूर्वी अर्ज केले असल्यास प्रलंबित अर्जाची प्रत संबंधित संपर्क अधिकाऱ्याकडे सादर करावी.
शिबिराचे वेळापत्रक
अ.क्र मंडळाचे नाव दिनांक
1 गणेशपूर 7 मार्च 2026
2 राजूर 14 मार्च 2026
3 रासा 24 मार्च 2026
4 भालर 1 एप्रिल 2026
5 पुनवट 10 एप्रिल 2026
6 शीरपूर 17 एप्रिल 2026
7 शिंदोला 29 एप्रिल 2026
8 कायर 8 मे 2026
9 वणी 15 मे 2026
___________________________
प्रमाणपत्रे व दाखले
1. प्रलंबित फेरफार प्रकरणे
2. गाव नमुना 7/12 मधील चुका दुरुस्ती
3. डिजिटल 7/12 व 8-अ उताऱ्यांचे वाटप , सदर 7/12 प्राप्त झाल्यानंतर त्यात कोणतीही चुक अथवा तृटी असल्यास ती नियमाप्रमाणे तात्काळ दुरुस्त करुन देण्याची कार्यवाही करण्यात येईल.
4. उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्र वितरण
5. विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप
6. ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वितरण
___________________________
जमीन अभिलेख अद्ययावतीकरण
1. अकृषिक तरतुदींविषयी मार्गदर्शन व सुधारणा माहिती
2. नवीन व्यवस्थापन सनद प्रक्रियेची माहिती
3. तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांचा निपटारा
4. भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे
__________________________
सरकारी योजनांचा लाभ
1. सामाजिक व आर्थिक सहाय्य योजनांचा लाभ मंजूर करणे
2. घरांसाठी पट्टे वितरण
3. ई-मोजणी अर्ज स्वीकारणे
4. ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी
5. नवीन शिधापत्रिका तयार करणे व अद्ययावत करणे
________________________________________
इतर उपक्रम
1. आधार अद्ययावत करणे व इतर संबंधित सेवा
2. आयुष्मान योजनेचे कार्ड तयार करणे
3. पशुवैद्यकीय विभागामार्फत जनावरांचे लसीकरण, आरोग्य तपासणी, कृत्रिम रेतन व टॅगिंग
4. आरोग्य शिबिर – तज्ञ डॉक्टरांमार्फत नेत्र, कान-नाक-घसा, अस्थिरोग आदी तपासणी व उपचार; तसेच महिलांच्या आरोग्यविषयक मार्गदर्शन
भू-अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित असलेले मोजणी अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यात येतील.
वणी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
(निखील धुळधर)
तहसिलदार वणी

