ठळक बातम्या

    मराठी भाषा दिनानिमित्त नगर वाचनालयात वाचन मेळावा

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : मराठी भाषा दिनानिमित्त आज नगर वाचनालयात वाचन मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात अध्यक्षस्थानी वणी तालुका संघचालक हरिहर भागवत हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अभियंता नरेंद्र तराळे , सुनील ठाकरे उपस्थित होते. 

         या प्रसंगी अतिथीनी मराठी भाषेचे महत्व विशद करून या अभिजात भाषेचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.

    या प्रसंगी आयोजित वाचक मेळाव्यात ६५ वाचक सहभागी होऊन सलग एक तास मराठी पुस्तकांचं वाचन केलं. 

          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची पाथ्रडकर यांनी केले. 

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. आभार प्रदर्शन संचालक अर्जुन उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.




    Photo