विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
मारेगाव: मारेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव आणि नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. वीज वितरण, शेतीपंपांचा वीजपुरवठा, नवीन कनेक्शन किंवा वाढीव वीजबिलांसंदर्भात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची थेट दखल घेऊन त्यावर जागेवरच तोडगा काढण्यासाठी मा. आमदार संजयभाऊ देरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष 'जनता दरबार' आयोजित करण्यात आला आहे.
हा जनता दरबार दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या घोन्सा रोड मारेगाव येथील कार्यालयात पार पडणार आहे. आपल्या हक्काचा आवाज लोकप्रतिनिधींपर्यंत थेट पोहोचवून वीजविषयक अडचणींचे तातडीने निवारण करून घेण्यासाठी परिसरातील सर्व शेतकरी आणि नागरिकांनी या जनता दरबारास वेळेवर उपस्थित राहावे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मारेगाव तालुका

