ठळक बातम्या

    हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच.मृत्यू

     


    विदर्भवार्ता |प्रतिनिधी

    वणी : शिंदोला येथून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या कैलास नगर वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर हायवा ट्रकच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 30 फरवरी ला दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास घडली माहितीनुसार हायवा ट्रक क्रमांक JH13 /ल 68 95 हा मुंगोली कडून वेकोलीच्या खदानीकडे जात होता व दुचाकी क्रमांक MH 34 /BD 0887 

    या वाहनाचा चालक हा खदानी कडून कैलास नगर वसाहतीकडे जात असताना हायवा ट्रक ने दुचाकी स्वारास धडक दिली व तो खाली कोसळून हायवे ट्रकच्या मागील चाकात  आल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला मृत्यूकाचे नाव संतोष गोहने रा. भद्रावती असे आहे या घटनेची माहिती शिरपूर पोलीस स्टेशन ठाण्यात दिल्ली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे पोलिसांनी हायवा ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध घेत आहे या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असतात मात्र वेकोलीची कोणतीही सुरक्षा नाही तसेच रस्त्यावर पाणी मारत नसल्याने धुळीमुळे रस्ता सुद्धा दिसत नाही तरी या रस्त्यावर दिवसातून चार ते पाच वेळ पाणी मारण्यात यावे व सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी व कामगारांनी केली आहे. 




    Photo