विदर्भवार्ता |प्रतिनिधी
वणी /मारेगाव : स्व. श्रीमती राधाबाई सुर्यभान कुमरे यांच्या चौदावी (उतरकार्य) कार्यक्रम सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी मच्छिंद्रा (ता. मारेगाव) येथे शांत व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्यानपाठाने झाली. त्यानंतर भजन कार्यक्रम, भावपूर्ण मनोगत, ग्रामगीत वाचन व साप्ताहिक प्रार्थना पार पडली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांना भोजन प्रसाद देण्यात आला.
या प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, पत्रकार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी स्व. राधाबाई सुर्यभान कुमरे यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन चिरंजीव श्री. बादल सुर्यभान कुमरे व अमोल सुर्यभान कुमरे यांच्या वतीने करण्यात आले होते. उपस्थित सर्वांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

