ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरीता करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी:विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्यासमोर करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. मात्र, योग्य माहिती अभावी आणि इतरांचे अनुकरण केल्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. हाच संभ्रम दूर करण्यासाठी आणि देश-विदेशातील नवनवीन जागतिक करियर संधींबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी आदर्श परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, वणी आणि लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    हा कार्यक्रम, ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

    या मार्गदर्शन मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून  श्री. अनिकेत मोहितकर (IIT Roorkee) (IIM Ahmedabad) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल सोबत इतरही अनेक आधुनिक क्षेत्रांची माहिती दिली.

    महाविद्यालयाचे प्राध्यापक मा. प्रसाद खानझोडे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अध्यापक मा. प्रसन्ना जोशी सर, मा. डॉ. स्वप्निल गोहोकार, संस्थेचे अध्यक्ष मा. चंद्रकांत दोडके, सचिव मा. आकाश मत्ते (शिक्षक) व इतरही सर्व सदस्य यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.

    "११वी आणि १२वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वळण असते. योग्य वेळी मिळालेले योग्य मार्गदर्शन त्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय पातळीवरील शिक्षणाच्या आणि करिअरच्या संधी मिळाव्यात याच उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते," असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. पु. गोहोकार सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्रीकांत मडावी सर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मा. स्वरूप कुचनकर सर यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




    Photo