विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
घुग्गुस : दि. ९ जून : घुग्गुस येथील वर्धा नदी घाट परिसरात ८ जून रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत पाच युवकांचा बुडून मृत्यू झाला. या मृतांमध्ये धोबी समाजातील कुमार रोहित बाबाराव बोबडे (वय १७ वर्षे) यांचाही समावेश असल्याचे मृतदेह हाती लागल्यानंतर स्पष्ट झाले. या घटनेमुळे बोबडे कुटुंबासह संपूर्ण धोबी समाजावर शोककळा पसरली आहे.
रोहित बोबडे हे इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होते. अल्पवयातच त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी गेलेल्या रोहित यांचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
रोहित यांच्या निधनाची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजबांधवांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. धोबी समाजातील विविध पदाधिकारी व समाजबांधवांनी रोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, तसेच दुःख सहन करण्याचे बळ कुटुंबीयांना मिळावे, अशी प्रार्थना केली.
भावपूर्ण श्रद्धांजली!
कुमार रोहित बाबाराव बोबडे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी विदर्भवार्त / पत्र पोर्टल न्यूज वणी चॅनल कडून प्रार्थना करते आणि श्रध्दांजली अर्पण करते.

