विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : ३० जानेवारी — राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरात हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो. सत्य, अहिंसा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतीस आज विनम्र अभिवादन करण्यात आले.
या दिवशी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले अमूल्य प्राण अर्पण करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना, शहीद क्रांतिकारकांना तसेच भारतभूमीच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महात्मा गांधी यांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक असून त्याग, संयम आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे आहेत. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे ऋण सदैव स्मरणात ठेवण्याचा संकल्प करण्यात आला.
विदर्भ वार्ता-पत्र पोर्टल न्यूजच्या वतीने
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच सर्व हुतात्म्यांना व शहीद जवानांना विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.

