विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
नागरवाडी : श्री गाडगे महाराज मिशन, मुंबईचे उपाध्यक्ष तथा संत गाडगेबाबा धर्मशाळा ट्रस्ट, मुंबई, नाशिक व अमरावतीचे विश्वस्त मा. श्री. बापूसाहेबजी देशमुख सर यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रात्री २.३० वाजता नागरवाडी येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने संत गाडगेबाबांच्या सेवाकार्यातील एक समर्पित आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
बापूसाहेब देशमुख सर यांनी आपले संपूर्ण आयुष्य संत गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक सेवा आणि सेवाकार्याला वाहून घेतले. संत गाडगेबाबांच्या मानवतावादी विचारांवर त्यांची अढळ श्रद्धा होती. विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांत त्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग त्यांच्या कार्याची साक्ष देतो.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संत गाडगे महाराज मिशन, धर्मशाळा ट्रस्ट तसेच त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि अनुयायांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या कार्याची, सेवाभावाची आणि संत गाडगेबाबांवरील निष्ठेची आठवण सदैव स्मरणात राहील.
संत गाडगेबाबांच्या सेवाकार्यातील एक निष्ठावान सेवक हरपल्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी व अनुयायांप्रती सर्व स्तरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
विदर्भ वार्ता पोर्टल न्यूज वणी चे संपादक श्नी,संजय चिंचोलकर व चिंचोलकर परीवार कडून .

