ठळक बातम्या

    मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षपदी सुमित्रा नारायण गोडे

     वणीतील बैठकीत नियुक्तीची घोषणा; महिलांच्या प्रश्नांसह विविध विषयांवर चर्चा


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ. सुमित्रा नारायण गोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठ ऑगस्ट रोजी वणी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

    यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक परशुराम पोटे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे, वणी विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ, मनिषा निब्रड,तालुका अध्यक्ष सौ. सुनीता काळे, वणी शहर महिला अध्यक्ष प्रमिला चौधरी, संजय चिंचोलकर, राजू जयस्वाल, सुनील इंदुवामन ठाकरे, प्रमोद लोणारे, आकाश दुबे, सुरेंद्र निब्रड यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    नवनियुक्त  महिला जिल्हाध्यक्ष सुमित्रा नारायण गोडे यांनी आपले विचार मांडले. सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून आवाज उठविणार असल्याचे सांगितले. तसेच पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

    सुमित्रा गोडे यांच्या नियुक्तीबद्दल मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात. 

    बैठकीत 

    महिलांसाठी प्रसाधनगृह, आरोग्य, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा झाली. विशेषतः वणी शहरातील महिलांसाठी प्रसाधनगृहाची असुविधा तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर  प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले. या संदर्भात संबंधित विभागाकडे निवेदन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत सुविधा व मानवी हक्कांशी संबंधित प्रश्नांसाठी यापुढेही पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. बैठकीला परिषदेच्या सदस्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    विदर्भ वार्ता  पोर्टल न्यूज वणी  कडून  

    सुमित्रा नारायण गोडे यांची मानवी हक्क सुरक्षा परिषद यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन... अभिनंदन... अभिनंदन 



    Photo