ठळक बातम्या

    अद्विता अर्बन मल्टीस्टेटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी ४० जागांची भरती सुरू

     आर्णी, दारव्हा, माहूर, पुसद आणि वणी शाखांसाठी भरती; इच्छुक उमेदवारांनी १५ ऑगस्टपर्यंत बायोडेटा पाठवावा

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी अद्विता अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. यांच्या वतीने नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. संस्थेच्या आर्णी, दारव्हा, माहूर, पुसद आणि वणी येथील शाखांसाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    यामध्ये क्लर्क पदाच्या १० जागा, ब्रँच मॅनेजरच्या ३ जागा, सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्हच्या २ जागा तसेच एजंटच्या २५ जागा, अशा एकूण ४० पदांसाठी संधी उपलब्ध आहे.

    क्लर्क व सेल्स अँड मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी बी.कॉम., बी.सी.ए., बी.बी.ए., बी.एस्सी. आदी शैक्षणिक पात्रता अपेक्षित आहे. ब्रँच मॅनेजर पदासाठी एम.कॉम., एम.बी.ए., एम.एस्सी. (वाणिज्य, वित्त व विपणन विषयातील पदवी) तसेच संबंधित अनुभव आवश्यक आहे. एजंट पदासाठी १२वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी असून चांगले संवाद कौशल्य अपेक्षित आहे.

    बँकिंग व फायनान्स क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडेटा दि. १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवावा.

    📧 ई-मेल : hr.ho@advitaurban.com

    📞 संपर्क : 8080494923

    🌐 वेबसाईट : www.advitaurban.com

    बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Photo