ठळक बातम्या

    नवरात्रोत्सावनिमित्त वणी पब्लिक स्कूल मध्ये गरबा उत्सव उत्साहात साजरा!

     रंग,ताल आणि उत्साहाने शालेय परिसर दुमदुमला!

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कलागुलांना वाव मिळावा.  या उद्देशाने वणी पब्लिक स्कूल येथे गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवामुळे संपूर्ण शालेय परिसर आनंद,उत्साह आणि भक्तीमय वातावरणाने भारावून गेला . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.

    नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून गरबा नृत्त्याचा मनमुरात आनंद लुटला.रंगीबेरंगी पोशाख, आकर्षक सजावट, गरब्याच्या तालावर फिरकणारी पावले आणि पारंपारिक संगीत यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

    विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्य कौशल्याचे सुंदर प्रदर्शन करत उपस्थितांची  मने जिंकली.शाळेचे मुख्याध्यापक श्री सतिश बविस्कार यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण उत्सवाचे महत्त्व  विद्यार्थ्यांना सांगितले.  शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 

    गरब्याच्या तालावर रंगलेल्या उत्सवाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद  फुलवला आणि शाळेच्या वातावरणात चैतन्य निर्माण केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतीय संस्कृतीचा वारसा जपत एकतेचा, आनंदाचा आणि उत्साहाचा संदेश देणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.


    ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆



    Photo