विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी :मुकुटबन मार्गावर ऑटो आणि ट्रक चा भिषण अपघात झाला असून यात एक गंभीर जखमी असून तिन जन जखमी झाले आहेत. सर्व जखमी हे आदीलाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र- आंध्र प्रदेश बार्डर वरील पिंपळखुटी चेकपोस्ट जवळ असलेल्या चांदा गाव येथिल असल्याचे जखमींनी सांगितले.
सविस्तर बातमी अशी की, आदीलाबाद वरुन चार जन एका ऑटो रिक्षाने काही कामानिमित्त वणीला आले होते. आपले काम आटपून ते सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आपल्या गावाकडे आदीलाबाद जिल्ह्यातील चांदा येथे जाण्यासाठी वणी वरुन ऑटो रिक्षाने निघाले असता वणी - मुकुटबन मार्गावरील सेवनस्टार सागबन पुलाजवळ समोरुन एक भरधाव ट्रक येत असताना समोरासमोर ऑटो रिक्षा व ट्रक चा अपघात घडला यात एका ३५ ते ४० वर्षीय इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे तर तिन तरुण जखमी झाले झाले आहेत. जखमीवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमी झालेल्या इसमाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.


