ठळक बातम्या

    पोर्ट्रेट रांगोळी वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : येथील मार्कंडे हॉल येथे प्रसिद्ध आर्टिस्ट निशा दरेकर यांच्या वतीने पोर्ट्रेट रांगोळी वर्कशॉपचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी अवघ्या दहा दिवसांत अत्यंत सुंदर व बोलक्या रांगोळ्यांची निर्मिती करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

    वर्कशॉपदरम्यान विद्यार्थ्यांना रांगोळी कलेचे बारकावे, पोर्ट्रेट रेखाटनाची तंत्रे व रंगसंगतीचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये “आपण स्वबळावर काहीतरी घडवू शकतो” हा आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यशाळेनंतर आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनाला मा. पवण ऐकरे भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा ओ. बी. सी. अध्यक्ष व डॉ. सौ, जयश्री पवण ऐकरे हे उपस्थित राहून कलाकारांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. यावेळी अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशाच कलात्मक उपक्रमांची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

    या यशस्वी आयोजनामुळे वणी शहरातील कलाप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, निशा दरेकर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






    Photo