ठळक बातम्या

    नृसिंह व्यायाम शाळेत खेळाडूंचा सत्कार

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : येथील नृसिंह व्यायाम शाळा प्रणित नृसिंह स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडूंचा सत्कार दिनांक 4 डिसेंबर ला नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला. यावेळी खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.


    नूकत्याच झालेल्या भंडारा येथील राज्य स्तरीय कबड्डी स्पर्धेत गौरी श्रीराम पिदुरकर, श्रद्धा प्रेमराज देशमुख व जानवी प्रकाश ठाकरे या तिन्ही खेळाडूंची जिल्हा कबड्डी संघात निवड झाली होती यापैकी गौरी श्रीराम पिदुरकर हिची विदर्भ संघात निवड झाली. दि. 27 ते 30 नोव्हेंबर ला  सोनिपत हरीयाना येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गौरी हिचा वणी येथील उज्ज्वल गौरक्षण संस्थेचे सचिव सुधाकर काळे गुरुजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी जे खेळाडू आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्यांना मदत करण्यांचे जाहीर केले. यावेळी व्यासपीठावर व्यायाम शाळेचे सचिव पुरुषोत्तम आक्केवार, कोषाध्यक्ष रमेश उगले, सुर्यकांत मोरे गुरुजी, पत्रकार बंडू निंदेकर, पत्रकार विशाल ठोंबरे, दीपक देठे, प्रशिक्षक कुणाल ठोंबरे 

     इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



    Photo