विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी – आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर २ डिसेंबर रोजी वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. शहरातील एकूण ६२ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची रांग दिसून आली. किरकोळ चुटपुट घटना वगळता संपूर्ण दिवसाचे मतदान पूर्णपणे शांततेत पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले.
या निवडणुकीत १४ प्रभागांसाठी एकूण ७ नगराध्यक्ष पदाचे आणि १४९ नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात होते. मतदारांनी कोणाला अंतिम विश्वास दिला आहे, हे येत्या २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणी नंतरच स्पष्ट होणार आहे.
एकूण मतदारसंख्या
पुरुष : २४,६०७
स्त्रिया : २४,९६४
एकूण : ४९,५७१
प्रत्यक्ष मतदान
पुरुष : १६,९३८
स्त्रिया : १६,१८८
एकूण : ३३,१२६
एकूण ६६.८३% मतदानाची नोंद झाली असून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याने निवडणूक विभागाने आनंद व्यक्त केला.
२१ डिसेंबरचा निकाल कोणत्या उमेदवाराच्या नशिबाला साथ देतो, याकडे संपूर्ण वणीचे लक्ष आहे.

