ठळक बातम्या

    विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत ऑल ईंडिया स्टुडंटस फेडरेशनचा दणदणीत विजय.

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    यवतमाळ : येथील जि. प. (मा. शा.) माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोधनी रोड यवतमाळ येथे नुकतेच विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका उत्साहात पार पडल्या. या निवडणुकीत ऑल ईंडिया स्टुडंटस फेडरेशनचा अत्यंत चुरशीच्या लढतीत दणदणीत विजय झाला.यामध्ये AISF चे कॉम्रेड आर्यन राठोड हे अध्यक्षपदी विजयी झाले असून कॉम्रेड कु.रोशनी कांबळे या सचिवपदी विजय झाल्या आहेत.

    विजयी दोन्ही पदाधिकारी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) चे सक्रिय सदस्य आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लढा देणे, सुविधा उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थी आवाज मजबूत करण्यासाठी ते कार्यरत राहतील, असे त्यांनी निवडीनंतर सांगितले.

    AISF तर्फे जिल्हाप्रमुख कॉ.अथर्व निवडींग यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून

    त्यांच्या पुढील नेतृत्वासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.




    Photo