ठळक बातम्या

    वणी–यवतमाळ मार्गावर भीषण अपघात बस–ट्रकची समोरासमोर टक्कर; अनेक जखमी, मृतांचा आकडा अद्याप अस्पष्ट


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी : वणी–यवतमाळ मार्गावर पांढरकवडा जवळील करंजी जळ्का गावाजवळ आज सायंकाळी साधारण आठ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी भरलेली बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन मोठे नुकसान झाले.

    अपघात इतका गंभीर होता की घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. प्राथमिक माहितीनुसार अनेक जण ठार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तर जखमी प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे समजते. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक स्रोतांनी दिली आहे.

    अपघातानंतर तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास सुरू केला आहे.



    Photo