विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी: नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराला आज अक्षरशः चरमबिंदू आला, कारण शिवसेना शिंदे गटाने काढलेल्या भव्य मेळाव्यांनी आणि रॅलीने शहराचे रस्ते थरारले. आजची रॅली ही वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि विक्रमी उपस्थितीची रॅली ठरल्याचा दावा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात, भगवा झेंडा डोलवत, पायदळ कार्यकर्त्यांच्या गर्दीने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांना नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून शिंदे शिवसेना गटाचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाला.
“शिंदे शिवसेना मस्त – विरोधक झाले फस्त” अशी घोषणाबाजी रॅलीभर दुमदुमत राहिली.
अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीने आणि पुष्पवृष्टीने केले.
महिलांचा आणि तरुणांचा लक्षणीय सहभाग खास करून दृश्य वेधून घेत होता.
स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते, आजच्या रॅलीत दिसलेली लोकांची प्रचंड उपस्थिती विरोधकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. मतदारांची पसंती कोणाकडे आहे हे आजच्या गर्दीतून स्पष्ट दिसत असल्याची चर्चा वणीभर रंगली आहे.
विरोधक पाणी पिण्यासारखे झाले पात!रॅली पाहून विरोधक गटांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात असून, अनेकांच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट जाणवत होता.
निवडणूक जशी जवळ येत आहे, तसा वणीतील राजकीय तापमानही चढताना दिसत आहे. आजच्या रॅलीने मात्र निवडणूक समीकरणांना मोठा कलाटणी मिळाल्याचे निश्चित!
वणीच्या मतपेटीत काय चित्र तयार होणार?
शिंदे लाट आणखी प्रबळ होणार का?
याची चर्चा शहरभर रंगली आहे.







