ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रचाराचा ताप वाढला; प्रभाग १ मध्ये शिवसेना शिंदे गटाची भव्य रॅली आणि कार्नर सभा

     


    विदर्भ वार्ता | प्रतिनिधी

    वणी – नगरपरिषद निवडणूक २०२५ चा प्रचार आता शिगेला पोहोचला असून सर्व पक्षांनी आपली ताकद झोकून दिली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार (अ) सौ. ढगे आणि (ब) कैलास बोबडे यांच्या समर्थनार्थ आज मोठी रॅली काढण्यात आली.

    या भव्य रॅलीला

    मा. विजय बाबू चोरडिया (जिल्हा संघटन),

    मा. विनोद मोहीतकर,

    मा. तुरविले सर

    मा. मणिष भाऊ सुरावार

    यांसह शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

    संध्याकाळी ७ वाजता विठ्ठलवाडी येथे आयोजित कार्नर सभेला प्रभाग १ मधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली. नागरिकांनी उमेदवार कैलास बोबडे व त्यांच्या टीमला ठोस पाठिंबा दर्शविल्याचे चित्र सभेत पाहायला मिळाले.

    स्थानिकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे —

    “प्रभाग क्रमांक १ मध्ये कैलास बोबडे यांचा विजय निश्चित!”

    प्रचाराला मिळत असलेला उत्साह पाहता शिवसेना शिंदे गटासाठी हा उत्साहवर्धक संकेत मानला जात आहे.

    Photo