विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी : वणी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सुशिक्षित, समर्पित आणि समाजमनाला जवळची असलेल्या सौ. विद्या खेमराज आत्राम यांना अध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. “एकच ध्यास — वणीचा विकास” या घोषवाक्यासह त्यांनी प्रचारात दमदार पाऊल टाकले आहे.
शिक्षिका म्हणून शेकडो विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सौ. विद्या आत्राम यांनी आता वणीच्या सर्वांगीण विकासासाठी दृढ संकल्प व्यक्त केला आहे. सामाजिक कार्य, शैक्षणिक अनुभव आणि प्रामाणिक नेतृत्व या गुणांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तम शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा यांसह वणीचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता सक्षम नेतृत्वात असल्याचा विश्वास भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिकही व्यक्त करत आहेत.
नागरिकांनी आशिर्वादाचे मत देऊन सुशिक्षित आणि सक्षम नेतृत्वाला नगरपरिषदेत संधी द्यावी, अशी विनंती सौ. विद्या खेमराज उर्फ सचिन आत्राम यांनी केली आहे.
