ठळक बातम्या

    प्रभाग क्र. १४ मध्ये शिवसेना शिंदे गटाची कॉर्नर सभा उत्साहात — नागरिकांचा ठोस पाठिंबा

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराचा जोर वाढत असताना प्रभाग क्रमांक १४ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कॉर्नर सभा मोठ्या उत्साहात पार पडली. स्थानिक नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता येथील वातावरण अधिक तापले आहे.


    सभेत अध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार (अ) प्रियंका पेंदोर, (ब) संतोष पारखी, (क) हिना शकील अहमद यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. पाणी, स्वच्छता, रस्ते, सुरक्षा आणि प्रभागाच्या मूलभूत गरजांवर खुलेपणाने चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या मागण्यांना उमेदवारांनी सकारात्मक प्रतिसाद देत भविष्यातील विकासकामांसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.

    या सभेत शिवसेना शिंदे गटाचे युवा नेतृत्व ॲड. कुणाल चोरडिया, मा. विनोद मोहीतकर, मा. शम सिद्दिकी, मा. कुतरमारे यांच्यासह कुमारी पायल तोडसाम यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे सभेला अधिक ऊर्जा मिळाली.



    स्थानिक नागरिकांचा मिळालेला मोठा प्रतिसाद आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना जोरदार पाठिंबा मिळण्याची शक्यता अधोरेखित करतो. प्रभाग १४ मध्ये झालेल्या या सभेनेही विजयाची चाहूल पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.

    Photo