ठळक बातम्या

    प्रभाग क्र. ७(ब) मध्ये अपक्ष उमेदवाराची जोरदार हवा; राजकीय पक्षांचे धाबे दणाणले

     


    वणी – विशाल ठोबरे

    वणी : प्रभाग क्र. ७(ब) मधील नगरसेवक पदाच्या शर्यतीत अपक्ष उमेदवार सचिन अरुण पाटील यांच्या दमदार प्रवेशाने राजकीय पक्षांचे गणित विस्कटले आहे. क्षेत्रातील सामाजिक कार्यातील सातत्यपूर्ण योगदान, नागरिकांशी मनमोकळा संवाद आणि समस्यांवर ठोस भूमिका यामुळे पाटील यांच्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

    माळीपुरा परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी निर्माण केलेली विश्वासार्ह प्रतिमा आता निवडणूक मैदानात त्यांची सर्वात मोठी ताकद ठरत आहे. निवडणूक जाहीर होताच त्यांनी वेगवान प्रचारयात्रेला सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराची हवा दिवसेंदिवस जोर धरत आहे.

    सचिन पाटील हे प्रभागातील प्रत्येक गल्लीबोळात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. पाणी, रस्ते, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था यांसह विकासाच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि भक्कम आराखडा मांडल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मकता वाढली आहे.प्रचारादरम्यान मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्यांच्या समर्थकांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले असून सचिन अरुण पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

    अपक्ष उमेदवाराच्या या दमदार लाटेमुळे प्रभाग क्र. ७(ब) मधील निवडणूक अधिकच रंजक बनली असून आगामी निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Photo