विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी:शहरातील गाडगेबाबा चौक येथील कोंडावार यांचे घरी 29 नोव्हेंबर रोजी दीड वाजताच्या दरम्यान दरोडेखोरांनी प्रवेश करून चाकूच्या धाकावर सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची खळबळ जनक घटना घडली.
प्राप्त माहीती नुसार गाडगेबाबा चौक परिसरातील संजय निळकंठराव कोंडावार वय ७० वर्ष हे पत्नीचे निधन झाल्यामुळे घरी एकटेच वास्तव्यात होते. ते सध्या शेती चा व्यवसाय करतात. संजय कोंडावार हे सधन व्यापारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्याकडे एक चौकीदार देखील ठेवला आहे. शनिवारी रात्री कोंडावार हे जेवण करून झोपी गेले त्यांचा चौकीदार हा बाहेर गस्त करीत होता. इतक्यात रात्री १:४५ चे दरम्यान चार बुर्खाधारी इसम दुकानासमोर आले व त्यांनी चौकीदाराला मारहान करीत मालकाला आवाज देण्यात सांगितले चौकीदारांनी मालकाचा आवाज दिला असता मालक बाहेर येताच एकाने कोंडावार यांच्या हातावर चाकूने जखम करून चौकीदार व कोंडावार यांना बंदिस्त केले. त्यानंतर घरातली अलमारी मधील रोख रक्कम अंगावरील सोन्याचा गोप, दोन अंगठ्या व ४:५०लाख रोख असा ऐवज लुटून पसार झाले. काही वेळाने तोंडावर आणि चौकीदार यांनी आपली सुटका करून वणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत आहे.
सकाळी घटनेची माहिती शहरात पसरतात एकच खळबळ उडाली.
घटनेचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.
