ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ — प्रभाग क्रमांक १ अपक्ष उमेदवार प्रकाश पिंपळकर यांच्याकडे मतदारांचा वाढता कल; “कामाचा युवा चेहरा” म्हणून ओळख ठसठशीत


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

     वणी : प्रभाग क्रमांक १ मधील आगामी नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले प्रकाश पिंपळकर यांच्याबाबत स्थानिक मतदारांमध्ये सकारात्मक चर्चा रंगत आहे. युवा नेतृत्व, सतत जनसंपर्क आणि प्रभागातील छोट्या–मोठ्या प्रश्नांवर तत्परतेने धावून जाणारा स्वभाव यामुळे पिंपळकर हे “कामाचा युवा चेहरा” म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येत आहे.


    मतदारांमध्ये “कामासाठी धावणारा माणूस हवा” असा सूर उमटत असून पिंपळकर यांची ओळखही याच कार्यशैलीशी जोडली जात आहे. त्यांचे निवडणूक चिन्ह “कपाट” असल्याने प्रचारात या चिन्हाचीही प्रभावी नोंद होत आहे.

    स्थानिक नागरिकांच्या मते, नगरसेवक कसा असावा? या प्रश्नाला प्रभागातील अनेक मतदारांचे एकच उत्तर — “प्रकाश पिंपळकर सारखाच”  असे ठळकपणे ऐकू येत आहे.

    प्रभाग क्रमांक १ मध्ये विविध उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणुकीची लढत रंगत असली तरी पिंपळकर यांच्या वाढत्या जनसंपर्क मोहिमेमुळे ही निवडणूक अधिकच रोचक बनली आहे.



    Photo