ठळक बातम्या

    विधानसभेत आमदार एकनाथराव खडसे यांची ठाम मागणी परीट समाजाला “एस.सी” प्रवर्गात समाविष्ट करा! संत गाडगे महाराज महामंडळ स्थापन करा!

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    नागपूर : राज्य विधानसभेत दिं. १०/१२/२०२५ ला परीट समाजासंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित करत आमदार एकनाथराव खडसे यांनी ठोस भूमिका मांडली.

    इतर राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही परीट समाजाला अनुसूचित जाती (SC) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी त्यांनी जोरदारपणे उपस्थित केली.

    तसेच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी “संत गाडगे महाराज महामंडळ” स्थापन करून परीट समाजाला विविध योजना, कर्जसुविधा व शैक्षणिक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी त्यांनी सभागृहात केली.

    खडसे यांच्या या मागणीला परीट समाजासह विविध सामाजिक संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून राज्य सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





    Photo