ठळक बातम्या

    आरओ फिल्टर प्लांटला येनक (हनुमान नगर) ग्रामस्थांचा टाळा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

     

    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी: ग्रामपंचायत येनक (हनुमान नगर) हद्दीतील आरओ फिल्टर प्लांटच्या गंभीर दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज (दि. १/१/२०२६) आरओ फिल्टर प्लांटला टाळा ठोकत निषेध व्यक्त केला. गेल्या सहा महिन्यांपासून आरओ फिल्टरची कोणतीही सफाई करण्यात आलेली नसून पाणी टाकीचीही स्वच्छता न झाल्याने पिण्याच्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत आहे.

    ग्रामस्थांच्या मते, अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना पोटाचे आजार होण्याची भीती व्यक्त होत असून, तरीही ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी आरओ प्लांटच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

    वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आज आरओ फिल्टर प्लांट बंद करून त्याला टाळा लावण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने तातडीने आरओ फिल्टर व पाणी टाकीची स्वच्छता करावी, नियमित देखभाल व्यवस्था सुरू करावी तसेच दोषी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सुनील उपरे , रवी गोरे, मोरेश्वर कुठलवार, गुलपवार तसेच गावकरी लोक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

    प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



    Photo