विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी नगर परिषदेच्या निवडणुकीत मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वणी शहर अध्यक्षा सौ प्रेमिला मनोज चौधरी यांचा विजय झाला आहे. त्याबद्दल मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार, परशुराम पोटे, सुरेश बन्सोड, भाऊ साहेब आसुटकर, सौ. सुमित्रा ताई गोडे,सौ सुनिता ताई काळे इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सौ प्रेमिला ताई मनोज चौधरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

