विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा बोर्डा येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (९ मार्च) उघडकीस आली. गणेश शंकर सुरपाम (वय ३६, रा. बोर्डा) असे मृतकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास गणेश सुरपाम यांनी गावातील एका विहिरीत उडी घेतल्याची माहिती समोर आली. ही बाब समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
मृत गणेश सुरपाम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ व वडील असा आप्तपरिवार असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
