ठळक बातम्या

    *ए.आय.एस.एफ.च्या नेत्रुत्वात यवतमाळ ये‍‌थे १७ मार्चला मराठी शाळा वाचविण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांचा प्रचंड एल्गार मोर्चा* *वणी यवतमाळ*

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी :  राज्य सरकारने पटसंख्येच्या कारणावरुन हजारो मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे त्याविरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ने  राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे.त्याअनुषंगाने दि.१७ मार्च २०२६ रोजी स.११ वाजता श्रमशक्ती भवन येथुन प्रचंड एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन आपले नि‌वेदन सादर करेल.निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे असतिल.

    १) राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.

    २) पटाच्या आधारावर शिक्षकांची संख्या ठरविणारे धोरण रद्द करण्यात यावे.

    ३) दत्तक शाळा योजनेअंतर्गत शाळांचे खाजगीकरण करण्याची तयारी सुरू असून दत्तक शाळा योजना रद्द करून शासनानेच शाळांची जबाबदारी घ्यावी.

    ४) सर्व शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदभरती तातडीने घेण्यात यावी.

    ५) शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त इतर कोणतेही कामामध्ये गुंतवू नये.

    ६) संचमान्यता शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित) करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेळसांड थांबवावी.

    ७) शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याचे निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावे.

    ८) सार्वत्रिक शिक्षण हक्क (RTE) कायद्यान्वये शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा (प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळाचे साहित्य, प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या, शौचालय, कम्प्युटर लॅब, इंटरनेटची सुविधा इत्यादी.) उपलब्ध करण्यात यावे.

    ९) शाळांना गरजेनुसार आवश्यक निधी देण्यात यावा.

    १०) शालेय पोषण आहारामध्ये सुधारणा करण्यात यावी व गुणवत्तापूर्ण जेवन विद्यार्थ्यांना देण्यात यावे.

    ११) शिक्षणावर GDP च्या ६% खर्च झालाच पाहिजे.

    १२) हिंदी विषय शाळेतील विद्यार्थ्यांवर लादू नये. नरेंद्र जाधव समिती रद्द करावी.

    १३) केरळ राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करण्यात यावे.

    या लक्षवेधी मोर्चात हजारोच्या संख्येत पालकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कॉ. अथर्व निवडिंग(राज्य कौन्सिल सदस्य),अयान शाह(जिल्हा समन्वयक),अभिजित नगराळे,रोशनी कांबळे, पियुष सोनुले,अनुष्का आत्राम,भुवनेश्वरी चामाटे,प्रेम ठेंगणे,कृष्णा यनगंदेवार,भुषण गणविर आदी एआयएसएफ च्या पदाधिकारयांनी केले आहे.




    Photo