ठळक बातम्या

    घरफोडीचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी शहरातील जैन लेआउट परिसरात घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ९ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजताच्या सुमारास जैन लेआउट येथील सुभाष ब्राम्हणे यांच्या घरी ही घटना घडली. आरोपीने घराचे कुलूप व कोंडा तोडून घरात प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले.

    या प्रकरणी कुनाल अनिल पाऊनकर (वय २४), रा. जैन लेआउट, वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (वय ३०), रा. पोहना ता. वणी जि. यवतमाळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३०५ (अ) व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदर गुन्हा ९ मार्च रोजी सकाळी ६.०२ वाजता वणी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक विशाल राठोड (बकल नंबर २३६३) हे करीत आहेत.



    Photo