ठळक बातम्या

    'सज्जन' च्या आत्महत्येने कायर गावात हळहळ; पण...! दोन दिवसांपासून होता बेपत्ता, विविध चर्चेला उधाण;

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कायर येथे एका इसमाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

     सज्जन भास्कर पिपंळकर वय अंदाजे ४७ वर्षे असे मृतकाचे नाव आहे.

     सज्जन हे मनानेही सज्जन होते आणि गावातही; मात्र त्यांच्या 'संसार' जिवणात असा काय प्रसंग आला असावा त्यांनी गळफास घेऊन आपले जीवनच संपविले! अशी चर्चा गावात सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार सज्जन हे दोन दिवसांपासून बेपत्ता होते. काही कारणावरून ते घरुन निघून गेल्याची माहिती नातलगांना मिळताच त्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला मात्र सज्जन चा पत्ता लागत नव्हता; अखेर सोमवारी २९ डिसेंबर ला त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील एका झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. 

    सज्जन हे मनमिळाऊ स्वभावाचे होते ते पुजारी चे काम करायचे , गावात कोणाच्याही घरी पुजा करायची असल्यास लोकं सज्जन यांनाच बोलवायचे. तसेच त्यांच्या नावे मौजा कायर येथे सामायिक मालकीची जमीन सुध्दा आहे. ते मोहदा येथिल गीट्टी खदानीतील एका मंदिरात पुजारी म्हणून काम करायचे अशी माहिती त्यांचे नातलग यांच्याकडून मिळाली.

    मात्र त्यांच्या 'संसार' रुपी जिवणात असा काय प्रसंग आला? त्यांनी आपले जीवनच संपविण्याचा निर्णय घेतला? अशा विविध चर्चेला उधाण आले आहे. 

    त्यांच्या पश्चात पत्नी मनिषा सज्जन पिपंळकर(३८) आणि एक मुलगा स्वानंद सज्जन पिपंळकर, वय ११ वर्ष असा आप्त परिवार आहे. 

     सज्जन ला आत्महत्या करण्यासाठी कोणी प्रवृत्त केले?हा विषय चौकशीचा असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

    Photo