ठळक बातम्या

    वणी : SBI कडून WCL कर्मचाऱ्याला ५० लाखांचा विमा दावा मंजूर

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : रस्ता अपघातात उजवा पाय गमावलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मधील कर्मचारी श्री. विजय पाल यांना स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वणी शाखेमार्फत कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज अकाउंट अंतर्गत ५० लाख रुपयांचा अंशतः अपंगत्व विमा दावा मंजूर करून देण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या गंभीर रस्ता अपघातात विजय पाल यांचा उजवा पाय गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या नावावर असलेल्या SBI च्या कॉर्पोरेट सॅलरी पॅकेज खात्याअंतर्गत असलेल्या अपघाती विमा संरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली.

    त्यानंतर SBI वणी शाखेच्या पुढाकाराने विमा कंपनीकडे दावा सादर करण्यात आला आणि प्रक्रियेची पूर्तता झाल्यानंतर ५० लाख रुपयांचा विमा दावा मंजूर करण्यात आला.

    या मदतीमुळे अपघातग्रस्त कर्मचाऱ्याला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, बँकेच्या या तत्परतेचे कौतुक व्यक्त केले जात आहे.



    Photo