ठळक बातम्या

    वणी तहसील कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक; नागरिकांच्या समस्यांवर अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत वणी तालुक्यातील महसूल भवन, तहसील कार्यालय येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्‍नांबाबत उपस्थित नागरिकांशी सविस्तर संवाद साधण्यात आला.

    बैठकीदरम्यान नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेत त्यावर त्वरित व प्रभावी उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून काम करणे आवश्यक असून जनतेच्या समस्या सोडविणे हेच प्राधान्य असल्याची भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केली.

    या बैठकीला उपविभागीय अधिकारी नितीकुमार हिंगोले, तहसीलदार निखिल धुळधर, गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, तसेच एकरे साहेब, पेचे मॅडम, सचिन गाडे, संजय खाडे, प्रमोद वासेकर, वंदना आवारी, करुणा काबळे, विकेश पानघाटे आदींसह इतर पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    वणी तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी दूर करून त्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.







    Photo