ठळक बातम्या

    संत गाडगेबाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महा बजेटमध्ये विशेष योजना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छता, सेवा आणि समाजप्रबोधनाचा दिलेला संदेश आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या कार्यातून समाजात स्वच्छता, समता आणि सामाजिक जागृतीचे महत्व अधोरेखित झाले असून त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही समाजमनावर कायम आहे.

    संत गाडगेबाबा महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने महा बजेट २०२६ मध्ये महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यात संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किटचा विकास, संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजना यांचा समावेश असून या योजनांमुळे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.


    या निर्णयामुळे संत गाडगेबाबांच्या विचारांना प्रत्यक्ष विकासाची जोड देण्याचे काम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या उपक्रमांबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

    गाडगेबाबांच्या स्वच्छता, सेवा आणि समाजहिताच्या विचारांवर चालत राज्याच्या विकासासाठी अशा प्रकारचे उपक्रम पुढेही राबविले जावेत, अशी अपेक्षा समाजातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.





    Photo