ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयात एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा.

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी :   येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व शिक्षण प्रसारक मंडळ, वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संगीत, कला व सांस्कृतिक कक्ष समन्वयक व युवा महोत्सव चमु व्यवस्थापकांची एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा शनिवार दि. ०७ मार्च २०२६ सकाळी ११.०० वाजता  महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात करण्यात आली आहे.

             शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या सदर कार्यशाळेचे उद्घाटन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माननीय कुलगुरु डॉ. मिलिंदजी बारहाते यांच्या हस्ते संपन्न होईल. 

             याप्रसंगी,डॉ. राजीवजी बोरकर, समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग, संगाबाअवि, अमरावती,नरेंद्रजी बरडिया, उपाध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ,श्री. निखिलेशजी नलोडे, जिल्हा समन्वयक, यवतमाळ जिल्हा,श्री. सुभाषराव देशमुख, सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ,श्री. अशोकराव सोनटक्के, सहसचिव, शिक्षण प्रसारक मंडळ,श्री. गजाननराव कासावार, सिनेट सदस्य, संगाबाअवि, अमरावती, उमापतीजी कुचनकार, ओमप्रकाशजी चचडा,  अनिलजी जयस्वाल, नरेंद्रजी ठाकरे, विनायकराव तत्त्वादी, नरेशजी मुणोत, सदस्य गण, शिक्षण प्रसारक मंडळ, वणी

    तसेच इतर मान्यवर उपस्थित राहतील. 

              या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने डॉ.राजीव बोरकर तथा डॉ. राहुल एकबोटे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील संगीत, कला व सांस्कृतिक कक्ष समन्वयक व युवा महोत्सव चमु व्यवस्थापक सहभागी होणार आहेत.



    Photo