श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त वणीत रक्तदान शिबिराचे आयोजन
विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : दि. ३१ डिसेंबर २०२५ वैराग्याची व सेवाभावाची शिकवण देणारे थोर समाजसुधारक श्री संत गाडगेबाबा यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त वणी येथील संत गाडगेबाबा चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर धोबी समाज सामाजिक-सांस्कृतिक संस्था, वणी यांच्या वतीने घेण्यात आले.
या रक्तदान शिबिरासाठी लाईफ लाईन, नागपूर व ज्ञानेश्वर भोंगळे, राजेश क्षीरसागर, कैलास बोबडे, संजय हरीभाऊ चिंचोलकर, महादेव दोडके, भास्कर पत्रकार, नरेंद्र क्षीरसागर, कवडू दुरुतकर, दिवाकर बोबडे, रमेश नांदे, गौरव नांदे, महेश बोबडे, प्रशांत महाकुलकर, भरत खिरकार,गजेंद्र थाटे,सतिष दोडके, श्नितेश दुरुतकर, संतोष वाजपेयी, राज चौधरी, अजय चिंचोलकर, सौ, दिशा अ चिंचोलकर, सारंग बिहारी, राहुल चौधरी, अनिल खिरकार, विनोद चिंचोलकर, जनार्दन थेटे,भरत बोबडे, रोशन चिंचोलकर, पवण बोबडे, धनराज हिवरकर,योगेश बोबडे....
यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सकाळपासूनच रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक-युवती व समाजबांधवांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले.
कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
एकुण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
“रक्त देणे हाच आपला रोकडा धर्म आहे, हिच आमची खरी सेवा आहे” असा प्रेरणादायी संदेश देत संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा प्रत्यक्ष कृतीतून जागर केला.
या उपक्रमामुळे समाजात सामाजिक बांधिलकी, मानवता व सेवाभावाची भावना अधिक दृढ झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





















