विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी | नगरपरिषद निवडणूक २०२५
वणी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २ मध्ये अपक्ष उमेदवार राजु भाऊ भोंगळे यांची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. चार वेळा नगरसेवक पद भूषविणारे १९९६, २००६, २०१२ आणि २०१६ अशा अनुभवी नेतृत्वाचे राजु भाऊ यंदाच्या निवडणुकीतही मतदारांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
प्रभागात गेल्या काही वर्षांमध्ये पाण्याची टाकी आणण्यासाठी केलेला पाठपुरावा, बगीचे, क्रांक्रीट रोड, अंडरग्राउंड नाल्या, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर केलेली तत्पर सेवा ही त्यांची ठळक ओळख बनली आहे. वार्डातील समस्यांवर थेट कार्यालयात धाव घेऊन उपाययोजना करणारा ‘‘लोकांचा माणूस’’ अशी राजु भाऊंची प्रतिमा नागरिकांत कायम आहे.निवडणूक जाहीर होताच प्रभाग २ मध्ये त्यांच्या समर्थकांची लगबग वाढली असून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची कामगिरी, सातत्य आणि अनुभवी कारकीर्द यामुळे स्थानिक राजकारणातही त्यांची नोंद घेण्यासारखी चर्चा सुरू आहे.प्रभाग २ मधील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून, अनुभवी अपक्ष उमेदवार म्हणून राजु भाऊ भोंगळे यांचे नाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.

