विदर्भ वार्ता |प्रतिनिधी
वणी : नगर परिषदेची निवडणूक अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचली असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये इमानदारीने निवडणूक लढविण्याचे काम सागर मुने करत आहे. त्यांनी पैशाची ताकद न दाखवता, लोकांना मजुरीने लोक आणून प्रचार न करता. मोजके कार्यकर्ते सोबत घेऊन घरोघरी जाऊन प्रचार करतांना दिसत आहे. समाजासाठी माझं काम आहे. त्यामुळे माझ्या प्रभागातील जनता सुशिक्षित आहे. त्यांना पूर्ण समजतं आहे, इतर पक्षातील लोक काय करत आहे. प्रचारात असणारे लोक कधी दुसऱ्या, कधी तिसऱ्या, तर कधी चौथ्या पक्षात प्रचार करतात व बऱ्याच महिला तोंड बांधून प्रचार करतांना दिसतात. त्यामुळे मी पूर्ण इमानदारीने खरी निवडणूक लढण्याची जी पद्धत आहे त्या नुसार मी लढतो आहे. माझ्या प्रभागातील नागरिक कार्य करणाऱ्या, जनतेच्या मदतीला धावणाऱ्या व्यक्तीला निवडून देतील. माझ्या मुळे इतर पक्षातील उमेदवारांना धोका निर्माण झाला असल्याने सर्वानी खूप ताकत लावून पैशाचा पूर वाहत आहे. नागरिक सागर मुने यांना कार्यशील, सदैव नागरिकांच्या मदतीला धावून जातो म्हणून माहित आहे. त्यामुळे सागर मुने यांना प्रभाग क्रमांक ४ च्या जनतेची पहिली पसंती दिसत आहे. आपल्याला निकालाच्या दिवशी कार्यशक्ती जिंकते की धनशक्ती हे
खर चित्र निकालाच्या दिवशी कळणारच यात मात्र शंका नाही.

