ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद २०२५ – प्रभाग ९ मध्ये शिवसेना शिंदे गटाचा जोरदार शक्तीप्रदर्शन! युवा नेतृत्व ॲड. कुणाल चोरडिया यांच्या उपस्थितीनं प्रचाराला भरारी

     


    विदर्भ वार्ता | प्रतिनिधी

    वणी | प्रभाग क्रमांक ९

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणांगणात प्रभाग क्रमांक ९ हा शिवसेना शिंदे गटाच्या दमदार प्रचाराने अक्षरशः पेटला आहे. पंचशील नगरात रात्री ७ वाजता आयोजित कार्नर सभेत युवा नेतृत्व ॲड. कुणाल चोरडिया यांची दमदार उपस्थिती आणि जोशपूर्ण भाषणांमुळे वातावरणात शिवसेनेची हाक घुमली.

    या सभेला अध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार

    (अ) सौ. इंदिरा पारखी

    (ब) निखिल खाडे

    यांच्या प्रचारासाठी मतदारांने मोठ्या उत्साहाने गर्दी केली.

    सभेचे नेतृत्व मा. विजय बाबू चोरडिया (जिल्हा संघटक), विनोद मोहितकर, सौ. नांदेकर, शिवराज पेचे आदी मान्यवरांनी सांभाळले. प्रत्येक वक्त्यानं प्रभागाच्या विकासाची ठोस रूपरेषा मांडत विरोधकांना टोला देण्यासही कमी केले नाही.

    मंचावरून उमटलेले आवाज

    "प्रभाग ९ विकासाच्या नवीन वाटचालीसाठी तयार आहे… यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनाच विजयी करू!"

    समर्पक संघटना, तरुणाईचा जोर, महिलांचा उत्साह आणि अनुभवी नेतृत्व यामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा.. 

    “प्रभाग ९ मध्ये हवा एकाच दिशेला… शिवसेना शिंदे गटका विजय निश्चित!”

    मतदारांचा एकमुखी सूर आणि सभेतील तुफानी प्रतिसाद पाहता शिवसेना शिंदे गटाने प्रभाग ९ मध्ये निवडणुकीचे पारडे भारी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

    वणीच्या राजकारणात प्रभाग ९ ठरणार ‘गेम चेंजर’ अशी कुजबुज सर्वत्र…

    Photo