ठळक बातम्या

    प्रभाग १० मध्ये कार्नर सभेला ला उत्स्फूर्त प्रतिसाद; अक्षय बोथरा–मीनाक्षी साठे यांच्या प्रचाराले जोर

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराला वेग येत असताना प्रभाग क्रमांक १० (भोंईपुरा) येथे आज आयोजित करण्यात आलेल्या प्रभावी कार्नर सभेला  स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.या सभेमध्ये  अक्षय बोथरा आणि मीनाक्षी साठे यांच्या प्रचाराची जोरदार मांडणी करण्यात आली. तसेच  नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम यांच्या उपस्थितीत प्रभागातील विकासकामे, जनसमस्यांचे निराकरण आणि आगामी निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.

    कार्यक्रमाला खालील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली :

    मा. विजय चोरडिया जिल्हा संघटक

     मा. विनोद मोहितकर

    मा. मनीष सुरावार

    मा. आशिष गुप्ता

     मा. राजेंद्र बोथरा

    सभेतील उत्साह, उमेदवारांना मिळालेला पाठिंबा आणि स्थानिक नागरिकांची सक्रिय उपस्थिती पाहता प्रभाग क्रमांक १० मधील निवडणुकीची लढत आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Photo