ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग १ मध्ये अपक्ष उमेदवार ‘कपाट’ची जोरदार लाट

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १ मध्ये अपक्ष उमेदवार प्रकाश पिंपळकर यांच्या प्रचाराला वेग आला आहे. ‘कपाट’ या बोधचिन्हावर उभे असलेले माजी नगरसेवक प्रकाश पिंपळकर हे प्रभागातील सर्वांगीण कार्यामुळे सर्वांच्या परिचयाचे आणि विश्वासाचे नाव ठरले आहेत.स्थानिक नागरिकांच्या सुख–दुःखात नेहमी धावून जाणे, अडचणीच्या शासकीय कामात तत्पर मदत करणे आणि प्रभागाचा सातत्याने विकास साधण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे पिंपळकर यांच्या बाजूने जनमत झुकत असल्याचे चित्र दिसत आहे.

    प्रभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या स्थानिक सर्वेनुसार प्रकाश पिंपळकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून त्यांच्या संपर्क, जनसंपर्क आणि घर-घर भेट मोहिमेमुळे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांची ताकद अधिक भक्कम होताना दिसत आहे.निवडणूक जवळ येत असताना प्रभाग क्रमांक १ मधील वातावरण अधिक रंगतदार बनले असून ‘कपाट’ चिन्हासमोर मतदार मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे चित्र उमटत आहे.



    Photo