ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ शिंदे लाटेत पायल तोडसाम चर्चेच्या केंद्रस्थानी

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : नगरपरिषद निवडणूक २०२५ ची रणधुमाळी जोरात असून शहरातील राजकीय समीकरणांना नवा वेग मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अध्यक्ष पदाच्या शर्यतीत कुमारी पायल तोडसाम या पुढे असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या वणीतील भव्य जाहीर सभेने निवडणुकीचा माहोल एकदम तापला. "लाडक्या बहीणीचा लाडका भाऊ" अशी भावनिक हाक देत शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा प्रभाव मतदारांवर स्पष्ट जाणवत असून शहरात एकच चर्चा — “फक्त आणि फक्त शिंदे शिवसेना!”

    सभेतील प्रचंड गर्दी, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि शिंदे यांच्या प्रभावी भाषणामुळे पायल तोडसाम यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. प्रभागस्तरावरही शिवसेना शिंदे गटाची चढती कामगिरी दिसून येत असून कार्यकर्त्यांची घराघरांत धडाकेबाज मोहीम सुरू आहे.



    आगामी काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होणार असला तरी सध्या तरी वणीतील राजकीय वातावरणावर शिंदे गटाचीच छाप दिसून येत आहे.

    Photo