ठळक बातम्या

    वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाची प्रभावी कॉर्नर सभा

     


    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या प्रचाराला वेग येत असताना प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली कॉर्नर सभा उत्साहाच्या वातावरणात पार पडली. नगरसेवक पदाचे उमेदवार धर्मा काकडे व सौ. किरण कुत्तरमारे, तसेच अध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या या सभेला स्थानिक नागरिकांचा उल्लेखनीय प्रतिसाद लाभला.

    सभेदरम्यान नागरिकांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, नाली, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यासंबंधित विविध अडचणी मांडल्या. उमेदवारांनी या सर्व समस्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर ठोस तोडगे काढण्याचे आश्वासन दिले. “विकासाला प्राधान्य आणि नागरिकांची सेवा हेच आमचे ध्येय,” असे उमेदवारांनी सांगितले.

    सभेला उपस्थित मान्यवर:

    मा. शम सिद्धिकी

    मा. कुणाल चोरडिया

    मा. विनोदभाऊ मोहिकर

    मा. मुरलीधर कुत्तरमारे

    मान्यवरांनी प्रभागातील सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेत भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली. प्रभाग १३ मध्ये शिवसेना शिंदे गटाला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत या उमेदवारांची कामगिरी जोरदार राहील, अशी चर्चा नागरिकांत दिसून आली.

    सभेच्या शेवटी उमेदवारांनी नागरिकांचे आभार मानत विकासाच्या नवीन पर्वाची हमी दिली.

    Photo