ठळक बातम्या

    ग्रामिन परिसरातील शांतता धोक्यात. अवैध धंद्यावर तातडीने कारवाईची मागणी

     

    विदर्भ वार्ता |प्रतिनिधी

    वणी : दिनांक २५/११/२०२५ रोजी मा.उपविभागीय अधिकारी यांना आंबेडकरी जन आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले आहे.मा.उपविभागीय अधिकारी, वणी यांना निवेदन सादर करताना आंबेडकरी जन आंदोलनचे मुख्य संयोजक अनिल तेलंग, प्रहार पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मोबीन पिरसाहेब शेख यांनी वणी तालुक्यातील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अवैध रेती तस्कर, अवैध दारू व्यावसायिक सामान्य जनतेवर दहशत निर्माण करून,आमिषे देवून किंवा अन्य मार्गाने आपल्या आवडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभावित करु शकतात ही भुमिका मांडली.जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत अवैध व्यावसायिकचा प्रभाव निष्प्रभ करण्यासाठी अवैध रेती तस्कर, अवैध दारू व्यावसायिक व अन्य अवैध धंद्यावर सक्त कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

                 
    या निवेदनात दिनांक १८/११/२०२५ व २०/११/२०२५ रोजी वे को लीच्या मुंगोली खाणं परिसरातील महालक्ष्मी कॅम्प व मुंगोली खाणं सायलो परिसरात साठवणूक करण्यात आलेल्या रेती साठ्यावर कार्यवाही करताना महसूल निरीक्षक श्री राठोड व पटवारी श्री गजभिये यांनी केलेल्या दफ्तर दिरंगाईमुळे रेती तस्करांनी रातोरात जप्त केलेली रेती लंपास केली याची जाणीव मा.उपविभागीय अधिकारी यांना करून दिली.या सर्व पार्श्वभूमीवर आंबेडकरी जन आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्या करण्यात आल्या 

    १) शिंदोला - तरोडा सर्कल व कायर - शिरपूर सर्कलमध्ये अवैध रेती तस्करी बंद करण्यात यावी 

    २) दिनांक १८/११/२०२५ व २०/११/२०२५ रोजी जप्त करण्यात आलेला अज्ञात रेती तस्करांनावर गुन्हा दाखल करण्यात यावा 

    ३) मुंगोली खाणं परिसरातील सायलो जवळ व महालक्ष्मी कॅम्प मागे रेती साठा असणे म्हणजे मुंगोली उपक्षेत्रिय प्रबंधक यांच्या आणि एमटेक कंपनी, महालक्ष्मी प्रा.लि या अंतर्गत कंपनीने रेती तस्करांना सहकार्य केले म्हणून सह आरोपी करण्यात यावे 

                  या मागण्यांचे निवेदन सादर करताना आंबेडकरी जन आंदोलन चे मुख्य संयोजक अनिल तेलंग, प्रहार पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मोबीन पिरसाहेब शेख, रितेश भगत,जावेदभाई, प्रदिप मून, रफिक शेख व अन्य सहकारी उपस्थित होते

    Photo