विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
कारंजा लाड : कारंजा लाड जि.वाशीम येथील समाज बांधव आज दिं.११.१२.२०२५ गुरूवारला समाजाचे सन्मानीय शिस्तबद्ध असलेले व निष्ठेने कार्य करणारे जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.संजयराव ससाणे यांची कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांना संत श्री. गाडगेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष मा.विश्वनाथ राऊत, कारंजा यांच्या तर्फे ,"गौरव चिन्ह "व प्रा.रमेश सांबसकर यांच्या तर्फे, "साने गुरुजींचे जीवन चरित्र पुस्तक "प्रधान करण्यात आले.सप्रेम भेट देण्यात आले.
त्यांना भेट देतांना सोबत, सेवानिवृत्त पटवारी मा.संजयराव सावरकर, एस.टी.महामंडळातून सध्या सेवानिवृत्त झालेले मा.गजाननराव हरिभाऊ तिडके ,महाराष्ट्र परीट (धोबी) सेवामंडळाचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रा.रमेश आ. सांबसकर व लाॅन्ड्रीधारक वाशिम जिल्हाध्यक्ष मा.श्रीकृष्ण सोनोने.व मा.गोपनारायण, महिला प्रतिनिधी सौ.सुनंदा रमेशराव सांबसकर..

